अभिषेक बच्चन करोना निगेटिव्ह; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज ; ट्विट करत मानले चाहत्यांचे आभार

अभिषेक बच्चन करोना निगेटिव्ह; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

⭕ ट्विट करत मानले चाहत्यांचे आभार

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. अखेर अभिषेकने करोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्याला रुग्णालायतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिषेकने ट्विट करत ही माहिती दिली आहे.

एक वचन हे एक वचनच असतं.आज माझी करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मी तुम्हा सगळ्यांना सांगितलं होतं मी करोनावर मात करेन. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांची केलेल्या काळजीसाठी मनापासून धन्यवाद. नानावटी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांनी माझ्यासाठी जे काही केलं त्यासाठी मनापासून त्यांचे आभार, असं ट्विट अभिषेकने केलं आहे.

दरम्यान, अभिनेता अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाल्यानंतर कुटुंबातील अभिषेक, ऐश्वर्या राय -बच्चन आणि आराध्या बच्चन यांना करोनाची लागण झाली होती.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *