युजवेंद्र चहल लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, साखरपुडा सोहळा संपन्न

युजवेंद्र चहल लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, साखरपुडा सोहळा संपन्न

घरच्यांच्या उपस्थितीत पार पडला छोटेखानी सोहळा

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. YouTuber धनश्री वर्मा आणि चहलचा घरच्या घरी छोटेखानी साखरपुडा सोहळा संपन्न झाला आहे. धनश्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही आनंदाची बातमी दिली आहे. धनश्रीने ही बातमी सोशल मीडियावर सांगितल्यानंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

धनश्री वर्मा ही भारतातल्या प्रसिद्ध यू-ट्युबर पैकी एक मानली जाते. तिच्या यू-ट्युब चॅनलचे 1.5 million फॉलोअर्स आहेत. अनेकांना चहल आणि धनश्री वर्माच्या या बातमीने आश्चर्याचा धक्का बसला आहे. लॉकडाउन काळात चहल घरात बसून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत होता. अनलॉक काळात चहलने सरावासाठी सुरुवात केली असून तो लवकरच आयपीएलच्या तेराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळताना दिसेल.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *