-ll निर्जन शहर ll-
-ll निर्जन शहर ll-
काय झालं या शहराला
अचानक निर्जन, निस्तब्ध
एकेकाळी खूप वर्दळ असायची
लोकांकडे एकमेकांसाठी वेळ नव्हता
पण, पण आज सगळ थांबलं
ट्रेन थांबल्या, बस थांबल्या
बघता बघता गर्दी सारी ओसरली
राहिली फक्त नि फक्त निरव शांतता
कालपर्यंत सगळ्यांना शिखर गाठायचं होत
खूप काही मिळवायचं होत प्रत्येकाला
नाव कमवायचं होत या जगात
पण आज सगळ नकोसं झालं आहे
एका क्षणात होत्याचं नव्हत झालं
एरवी धावणारी लोकं घरात अडकली
जुन्या आठवणी ताज्या करायला लागली
आपले छंद जोपासायला लागली
खर तर गर्दीची, शर्यतीची गरज नव्हती
आता उगाच पळापळ बंद झाली
काही दिवस का होईना पण वेळ मिळाला
या निर्जन शहरात माणस दिसायला लागली
हो, निर्जन शहरात माणस दिसायला लागली