-Ii 🌧️ पाऊस 🌧️ Ii-
आल्यात पाऊसधारा
नटली सजली वसुंधरा
झेलूया चला पागोळ्या
आनंदी चैतन्याचा झरा
झूलती वृक्ष लता पाने
झालेय हिरवे सारे रान
नद्या ओढे तुडुंब भरले
गेले हरपुनी सारे भान
बळीराजा हरखून गेला
पिकतील शेते रानमळे
खुशीनेच खुललेत सारे
भरून गेलेत सारे खळे
हर्ष मानसी खूप झाला
मोर वनी नाचू लागला
श्रावणसरींच्या आगमने
कोकिळ मल्हार गायला
दिन सोहळ्यांचे उगवले
लेकीबाळांना खूश केले
माहेरच्या गोड आठवांने
पापण्यांनाच ओलावले