,◼️सुखाची सावली…✍️प.सु. किन्हेकर, वर्धा

-Ii सुखाची सावली Ii-


सुखाची सावली देते
झाड माझे नाव
मुळ खोड फांदी
असते पाने हिरव!!

शुद्ध हवा प्राणिमात्रांना
रसाळ फळे चाखायला
सुवासी फुले माळायला
या वृक्षारोपण करायला !!

थकलेल्या वाटसरूंना
गाढ निद्रा घ्यायला
झाडच उपयोगी आहे
आजारी जखम औषधोपचराला !!

निर्सगाला मदत करू
एकतरी झाड लावू
सेंद्रीय खत औषधानी
रोपांची वाढ करून दावू !!

आई माझा कल्पतरु
सावली समान उभी
पिलांसाठी होई आधारु
माया शितल चांदणी नभी !!

◼️✍️प.सु. किन्हेकर, वर्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *