◼️आदिवासीसमाज परिवर्तन काळाची गरज 

आदिवासीसमाज परिवर्तन काळाची गरज 

◼️✍️जितेंद्र पेंदाम
 
आदिवासी समाज द- या खो- यात राहनारा. जंगलातील कंदमुळे खावुन जिवन जगनारा. जंगलावर प्रेम करनारा. निसर्गावर अवलंबून राहनारा. निसर्गाला  देव माननारा.
ज्याचं आकलन होत नाही त्याला ईश्वर माननारा.
पुर्वीचा आदिवासी जंगलात राहुन अंगावरती झाडांची पाने गुंडाळुन राहत होता .
तिर कामटा हा त्यांचा शस्र . जंगलात आदिवासी समाज राहत असला तरी वन्य प्रान्यांची शिकार करत नसत . कारन ते त्यांना देव मानत होते.
आपल्या संरक्षनासाठी ते तिरकामट्यांचा वापर करत असत.
अनेक कित्येक लेखामध्ये आदिवासींना शिकारी मध्ये गोवलं ,आदिवासींना वन्य प्राण्यांची शिकार करीत असल्याचे लिहिल्या गेलं. कदाचित सशोंधनाच्या इतिहासातुन लेखातुन लेख येत गेल्याने त्यांनी बरोबर लिहिलं असलं तरी सुधारीत मन मानायला तयार नाही. खरच माझा आदिवासी समाज ज्या निसर्गावर प्रेम करतो. प्राण्यांना पुजतो त्या प्राण्यांची हत्या करेल काय हा प्रश्न मनाला सशोधन करनारा आहे. आदिवासी समाज ईश भक्त आहे. म्हनुन पुर्विची महादेवाची ( मोठ्या देवाची काठी म्हणतात.) काठीला फार महत्व होते. कदाचित शहरी भागात महत्व नसली तरी ग्रामिण भागात तिचं महत्व आहे. आणि ते अद्यापही आहे.
अनेक प्राण्यांना त्यांनी देवच मानला.
आदिवासी समाज हा अशिक्षित समाज. त्यांचं जिवनच जंगलात गेल्याने शिक्षणापासून वंचित राहीला.
त्यांना रानटी समजुन दुरलक्षकेले.
त्यांना सुशिक्षित प्रवाहात अनेक वर्ष येवूच दिले नाही. त्यामुळे आदिवासी समाज वंचित राहीला.
पंरपंरा जशी होती तशीच चालवायची अशी त्यावेळी धारना होती . त्यामुळे परंपरागत शेतीचे कामे करनं , कंदमुळ जमा करने, लाक डिंक जमा करने, मोहफुले जमा करने हा त्यांचा व्यवसाय होता.
या सोबतच आदिवासी समाज कला कुसर मध्ये कमी नव्हतं.
उपलब्ध असलेले साधन बांबू, गवत , जंगलातल्या सिंधी यापासुन वेगवेगळ्या डिझाइन करनं, वेगवेगळ्या वस्तू बनवनं हा त्यांचा छंद होता.
आदिवासी समाज हा संगित विषयात ही अव्वल होता. आदिवासी नृत्य, आदिवासी गोंडी ढेमस्याला तर तोड नाही. आदिवासी चा नृत्य बघायला गर्दी करतात.
गायन करने ,वाद्य वाजविने नृत्य करने यामध्ये पारंगत होता. विविध साधनाचा वापर करून संगित मिलाप करीत होते.
आदिवासी समाजात अशिक्षितपना असला तरी कलागुणामध्ये अव्वल समाज म्हनुन समाजामध्ये मान्यता पावलेले होते. आजही आदिवासी समाजातले कलागुणाची जागा कुणी ही घेत नाहीत.
आजही आदिवासी समाजामध्ये गायन कलेत कला गुणात पारंगत आहेत.
आदिवासी समाजावर अनेक वर्षापासुन अत्याचार होत आहे.
पुर्वी आदिवासींना जिवनाच्या सुंदर प्रवाहात , शिक्षणाच्या प्रवाहात येवू दिले नाही . त्यांना चांगल्या गोष्टीचं महत्व कळू दिले नाही.
आदिवासी ना रानटी ,जंगली म्हनुन हेटाळनी करत आदिवासी समाजाची उपेक्षाच केली.
आदिवासी समाज हा सत्यावर आधारीत समाज आहे. सत्यापुढं जिव देनारा समाज म्हनुन समाजामध्ये ओळख आहे.
एखाद्या व्यक्तीला शब्द दिला तर तो शब्द पाळनारा समाज आहे.
दुस-या व्यक्तीच्या बोलन्यावर सहज विश्वास ठेवनारा परंतु बुद्यिवंत समाज म्हनुन मानल्या गेला आहे.
आदिवासींचा ज्यांनी अभ्यास केला त्यांनी भोळे भाबळे आदिवासी लोकांचा वापर केला.
आदिवासीच्या कलागुण किंवा त्यांचा उपयोग व्हावा म्हनुन आमिष दाखवन्यात येत असल्याने यात आदिवासी समाज भरकटला गेला. त्यात विविध प्रकारचे पैलू चा वापर केला .
आदिवासी समाजावर अनेक वर्षापासुन अत्याचार होत गेला.
अत्याचारावर आवाज उठवना-या व्यक्तीचा आवाज दाबल्या जात होता. छेडखानी काढनं, जातीवाचक बोलनं हे तर आदिवासींच्या पाचविला पुजलेला असायचा. त्यावेळी ज्यांचं शासन असायचा ते ही आदिवासींना न्याय देण्यास भेदभाव करत असत. आदिवासी समाजाचे शोषन कसा करायचा याचं पद्धतशिर जणू प्रशिक्षन त्यांनी घेतलं होतं.
त्याचाच परीणाम अत्याचारावर अत्याचार व शोषनावर शोषन व्हायचे.
एकसंघ असलेल्या समाजामध्ये फुट पाडून मानसा मानसा मध्ये वाद निर्माण करून त्याचा उपयोग करून घायचा असा विडाच जनू प्रस्थापित विचारांनी घेतला होता.
आदिवासींच्या जमिनी हडपने , ते आपल्या नावाने लावने, निराधार , भुमिहीन बनवने असा त्यांच्यावर अन्याय व अत्याचार होत गेला.
 जसजसा वातावरन बदललं तसं आदिवासी समाज ही बदलला. त्यांनाही उंच़भरारी मारायची होती . अंधारलेल्या समाजाला बाहेर आनन्याकरीता शिकले सवरले समाज सुधारक , समाज सेवक सरसावले . अनेकांना यातना सोसाव्या लागल्या.
हळू हळू समाज सुधारत चालत असलातरी अत्याचार व शोषन कमी झालेलं नाही. त्यामुळे घटने मध्ये त्याना आरक्षन व अत्याचार प्रतीबंधक कायदा अमलात आनावा लागला.
या कायद्याने वचक बसला असला तरी कायद्याची पाहीजे त्या प्रमानात अमलबजावनी होतांना दिसत नाही .
आजही आदिवासी समाजावर अन्याय व अत्याचार केल्या जात आहे.
आजही आदिवासी समाजाच्या मुलिवर अलैगिंक अत्याचार व शोषन होताना दिसत आहेत.
याला जबाबदार आदिवासी समाजातील सुशिक्षित वर्ग आहे.
आदिवासी समाजामध्ये हल्ली उच्चभूविभुषिक आहेत. चांगले शिकले सवरले आहेत. त्यांनी समाजाकडे दुर्लक्ष केलं.
सर्वच नसलेतरी आदिवासी समाजाची प्रगती न होण्याला आपन जबाबदार आहोत हे नाकारता येत नाही.
शिकले सवरले नौकरी लागली की अभिमानाने आपल्याच समाजाला खालच्या दर्जा मध्ये पाहन्याची मानसिकता असलेल्यांची संख्या कमी नाही . सर्वच नसले तरी काहीक लोक अजुनही समाजाप्रती संवेदनक्षिल आहेत. समाजाला धरून आहेत . आवाज उठवतांना दिसत आहेत.
आता समाज जागृत होत असला तरी पाहीजे त्या प्रमानात प्रगती झालेली दिसत नाही.
त्यासाठी खालील बाबी गांभिंर्याने घावं लागेल.
१) समाज एक्या झेंड्याखाली यावं लागेल .
२) समाज संघटीत करावं लागेल.
३) दुर्बल घटकाला मदत करावी लागेल
४) प्रस्थापित विचारांपासून त्यांना मुक्त करावं लागेल.
४) नविन विचारधारा आत्मसात करावी लागेल.
५) आपसातील मतभेद बाहेर काढावं लागेल.
६) अत्याचार व शोषना विरूद्ध आवाज उठवावं लागेल.
हे सर्व काळाची गरज आहे.
आता समाजाला बदलावं लागेल.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *