◼️ काव्यरंग :- सहवास तुझा..✍️ सौ.सविता पाटील ठाकरे; सिल्वासा,दा.न.ह.

-ii सहवास तुझा..ii-

जरा दूर आहे..पण खास आहे..
तुला भेटण्याची..ही आस आहे..
लावण्य माझे हे… तुला मोहविते
जिंदगी खरी..मधुमास आहे..

नाही जवळ..तरी भास होतो..
तुजसाठी आतुर..हा श्वास होतो..
पहाटस्वप्नात.. जरी तू येतो
मला जगण्याचा..विश्वास देतो..

शब्द हे हृदयी..निवास करती..
फुले आठवांची..विश्वास देती..
ठसे पावलांचे..क्षितीजा पल्याड..
स्पंदन सख्या गीत..तुझेच गाती..

साथ तुझी ही..आवडे मनास..
मजसाठी आहे…मृदगंध सुवास..
वाटे हवासा..सहवास तुझा..
स्वप्नझुल्याचा..हा नवा प्रवास..

मनी बांधते रोज..नवे अदमास..
तुजविन सारं..वाटे भकास..
मिळेल का मला..साथ ही तुझी..
श्वासांनाही नित्य..तुझाच ध्यास..

◼️✍️ सौ.सविता पाटील ठाकरे
             सिल्वासा,दा.न.ह.
◼️ ©️प्रशासक,मराठीचे शिलेदार समूह

One Reply to “◼️ काव्यरंग :- सहवास तुझा..✍️ सौ.सविता पाटील ठाकरे; सिल्वासा,दा.न.ह.”

  1. सविता पाटील ठाकरे, सीलवासा दादरा नगर हवेली says:

    मनस्वी आभार सरजी मराठी भाषा सक्षमीकरणासाठीच्या आमच्या उपक्रमास आपली सोबत आम्हास प्रेरणादायी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *