-ii श्रीकृष्ण जन्माष्टमी ii-
गोकुळात आज सखी
रंगला गं बाई सोहळा
बालकृष्ण हा जन्मला
आनंद साऱ्या गोकुळा
यशोदा न् नंदलालघरी
जन्मला कृष्ण कन्हैया
वृंदावनीची रासक्रीडा
हरखली यशोदामैया
गोपगोपी ही हरखले
बालकान्हाला पाहुनी
नंदराज नि यशोदेचा
आनंद माईना गगनी
सत्यकथा रहस्य असे
देवकी अन् वासुदेवाचे
कंसापासुन वाचवाया
युक्तीने रक्षण बाळाचे
कारावासातुन वासुदेवे
डोईवरुनी नेला श्रीहरी
पहारेकरी सुस्त झाले
जादू केली कृष्णमुरारी
यमुनेच्या महापुरातही
चालिला वासुदेवराय
स्पर्श कान्हापदांचाच
ओसरली यमुनामाय