◼️ काव्यरंग :- श्रीकृष्ण जन्माष्टमी..✍️मीना अरुण उगलमुगले, मुंबई 

श्रीकृष्ण जन्माष्टमी

वासुदेवाचा पुत्र जन्माला,
श्रीकृष्ण बाळ देवकीपोटी,
गोकुळी जाऊनी आनंदाने,
भरली यशोदेची ओटी.

सावळ्या रंगी धरिले,
सुंदर रुप देखणे,
नटखट मजा मस्ती,
गोकुळी सारं मनी रेखणे.

मस्तकी तुरा मोरपिसाराचा,
कृष्णाचे तेज दिसती खुलूनी,
मुखात धरुनी बासूरी,
निघे वाणी मधूर स्वरतूनी.

गोकुळी नाचून गवळणी दंग,
लोण्याचा गोळा खाऊनी,
सोबत नाचूनी कान्हा,
गवळणीच्या स्वप्नांचा भंग.

श्रीकृष्ण जन्माष्टमीला,
सजती सुंदर गवळणी,
सजवूनी पाळणा कृष्णास,
झुला देऊनी गाती श्रीकृष्ण पाळणा.

◼️  मीना अरुण उगलमुगले, मुंबई 
    ©️सदस्य मराठीचे शिलेदार समुह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *