हे आहेत ‘Kings Of India’… या चिमुकल्यांची कृती पाहून तुम्हालाही त्यांचा अभिमान वाटेल

 ‘Kings Of India’… या चिमुकल्यांची कृती पाहून तुम्हालाही त्यांचा अभिमान वाटेल

या दोघांवरही होतोय कौतुकाचा वर्षाव

मुलं ही देवा घरची फुलं असं म्हणतात. मुलांचं मन हे साफ आणि निर्मळ असतं. अनेकदा त्यांच्या वागण्यामधून आणि कृतीमधून हे दिसून येतं. त्यातही लहानपणापासून प्राण्यांबद्दल प्रेम असणारी मुलं जरा जास्त संवेदनशील असतात असं म्हटल जातं. अशा मुलांना प्राण्यांबद्दल अधिक प्रेम असतं आणि ती या मूक्या प्राण्यांच्या वेदना सहज समजू शकतात असं म्हणतात. लहान मुलं आणि प्राण्यांमधील प्रेम दाखवणारा असाच एक फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये दोन मुलं एका कुत्र्याच्या पिल्लावर प्रथमोपचार करताना दिसत आहेत. फोटोमध्ये कुत्र्याचं पिल्लू हे मुलाच्या मांडीवर बसलं असून मुलगा त्याला बॅण्डएड लावताना दिसत आहेत.

इमाम ऑफ पीस (@Imamofpeace) या अकाऊंटवरुन या मुलांचा फोटो ट्विट करण्यात आला आहे. या फोटोला ‘टू इंडियन किंग्स’ म्हणजेच ‘भारतातील दोन राजे’ असे कॅप्शन देत या मुलांची मनं ही एखाद्या राजाइतकीच मोठी आहेत असं म्हटलं आहे. हा फोटो पाच हजार ४०० हून अधिक जणांनी रिट्विट केला आहे. तर ३८ हजारहून अधिक जणांनी तो लाइक केला आहे.

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक भारतीय हा फोटो भारतामधील लोकांबद्दल बरंकाही सांगून जातो, भारतामधील भूतदया आणि प्राण्यांवर प्रेम करा ही शिकवण प्रत्यक्षात कशी दिसते हे दर्शवतो.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *