पोंभुर्णा शहरात कोरोना च्या दहशतीचे वातावरण निर्माण करणार्या पोंभुर्णा नगरपंचायत चे नगराध्यक्ष तथा मुख्याधिकारी यांचेवर फौजदारी खटला दाखल करा

गरीबांवर लाकडाऊन व श्रीमंताला खुली सुट

पोंभुर्णा शहरात कोरोना च्या दहशतीचे वातावरण निर्माण करणार्या पोंभुर्णा नगरपंचायत चे नगराध्यक्ष तथा मुख्याधिकारी यांचेवर फौजदारी खटला दाखल करा

वंचित बहुजन आघाडी पोंभुर्णा चे जिल्हाधिकारी यांना निवेदन

पोंभुर्णा :- शहरातील कोरोना बाधीतांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश असुन अनेक कर्मचाऱी जिल्हा व जिल्हा बाहेरून शहरात आले हाेते. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांच्या बेफिकरीमुळे आज पाेंभूर्णा शहरात काेराेनाचा शिरकाव झाला. आणि त्यांचे संपर्कात येणारे आणखी काेराेना पाझिटिव्ह झाले. स्थानिक नगरपंचायत प्रशासनाकडून याेग्य ती खबरदारी घेण्यात आली नव्हती. नगरपंचायत आंधळ्यांची भुमिका घेत असल्याचेच एकूण चित्र आहे. नगरपंचायत मोठ्या दुकानदारासाठि खुली सुट व छोट्या दुकानदारांना मात्र कडक लाकडाऊन केल्या जात आहे.हि परिस्थिती नगरपंचायत पोंभुर्णा ने निर्माण केली आहे त्यामुळे नगरपंचायत पोंभुर्णा चे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचेवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी ने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

याकडे नगरपंचायतकडून दुटप्पी भूमिका घेतली जात आहे. आणि यामुळेच शासकीय कर्मचारी,मोठे दुकानदार निर्ढावलेले आहेत. आणि सामान्य माणूस, गोरगरीब जनता यात भरडल्या जात आहेत.
आज पाेंभूर्ण्यात अपडाऊन करणारे शासकीय कर्मचारी काेराेना बाधीत झाल्याने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिणामी जनजीवनही विस्कळित झाले आहे. चार महिन्याच्या लॉकडाऊन व अनलॉकच्या टाळेबंदीमुळे अनेक छोटे दुकाने बंद आहेत. लॉकडाऊनचे सर्व नियम हातावर आणून पानावर खाणार्‍या छाेट्या व्यावसायिकांवर लागू करण्यात आले. आणि मात्तबरांच्या माेठ्या दुकानांना खुली सुट देण्यात आली आहे. माेठ्या दुकानात काेराेना हाेत नसल्याचे जावई शाेध प्रशासनाने लावले असल्याचे पाहायला मिळत आहे.
छाेट्या व्यवसायीकांचे दुकाने बंद असल्यामूळे
त्यांचे कुटुंबातील लोकांवर उपासमारीची पाळी आली आहे.
याला जबाबदार संबंधित नगरपंचायत प्रशासन असुन त्या कर्मचाऱ्यांना जर गृहविलगीकरन किंवा संस्थात्मक विलगीकरनात ठेवले असते व तसे कठोर नियम ठेवले असते तर आज अशी पाळी आली नसती.
आणि नगरपंचायत पोंभुर्णा शहरातील फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते, पान सेंटर,चाय सेंटर,भेल सेंटर,व ईतर सर्व छोटे दुकानदार यांना विनाकारण त्रास देत आहेत यामुळे पोंभुर्णा शहरातील सर्व छोटे दुकानदार यांना दुकान सुरू करण्याची परवानगी द्यावी.

काेराेना काळात ज्या शासकीय कर्मचाऱ्यांनी अपडाऊन करून काेराेनाच्या आजाराला पाेंभूर्ण्यात शिरकाव केला व बेजबाबदारपणे वागत दुसर्‍यांना बाधीत केले आहे अश्या बेजबाबदार काेराेना रुग्णावर कार्यवाही करावे. तसेच अश्या बेजबाबदार कर्मचाऱ्याला पाठीशी घालणाऱ्या व डाेळे झाक करणार्‍या नगरपंचायत पोंभुर्णा चे नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांचेवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी पोंभुर्णा ने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी वंचित बहुजन आघाडी पोंभुर्णा चे तालुका अध्यक्ष चंद्रहास, उराडे रविभाऊ तेलसे तालुका महासचिव, श्यामकुमार गेडाम जिल्हा सदस्य, अतुल वाकडे तालुका अध्यक्ष युवा आघाडी, राजु खोब्रागडे शहर अध्यक्ष, अविनाश कुमार वाळके जिल्हा प्रमुख आयटि सेल चंद्रपूर, विशाल घडसे तालुका उपाध्यक्ष व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *