◼️ काव्यरंग :- गनिमी कावा

मराठीचे शिलेदार कविता, चारोळी समूहातील सर्व समूहात घेण्यात आलेल्या ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेतील ‘गनिमी कावा’ या

विषयावरील सर्वोत्कृष्ट ३ काव्यरचना. आपले मत, सूचना व अभिप्राय ‘सप्तरंगास’ कळवावे.

 

🔷 गनिमी कावा

सह्यगिरीच्या कडेकपारीत
पोलादासम शिवबा घडला
गनिमी काव्याने गर्जत
शत्रूंना राजा माझा नडला

मुघली सत्तेला बेचिराख
अन दुष्टांचा काळ ठरला
नसानसात जय भवानी
हा अवघा नारा भिनला
डोळ्यात अंगारा तेवत
गनिमांशी असा भिडला
गनिमी काव्याने गर्जत
शत्रूंना राजा माझा नडला

रयतेचे कवटाळूनी दुःख
सुख हृदयीच्या गाभाऱ्यात
ईशासम मानूनी शिवबाला
मावळे पूजती देव्हाऱ्यात
स्वराज्याची रोवुनी बीजे
गद्दारांना जिथे तिथे अडला
गनिमी काव्याने गर्जत
शत्रूंना राजा माझा नडला

युद्धनीती, निष्ठावंत मावळे
यांसवे मारे बाजी युद्धाची
दुरदूरवर पसरली ख्याती
जाणता राजा शिवबाची
ज्याच्या पुढे हार मानूनी
शाहिस्तेखान ही रडला
गनिमी काव्याने गर्जत
शत्रूंना राजा माझा नडला

◼️सौ छाया जावळे
    वाई, सातारा
    ©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह

🚩🌿🚩🌿🚩🌿🚩🌿🚩🌿🚩

◼️ गनिमी कावा

झोपेत असता केला घावा
तयासी म्हणती गनिमी कावा
करण्या शत्रूला नामोहरण
करावी हल्ल्याची योग्य गुंफन

साधूनी योग्य निशाणा
असावा तडफदार बाणा
घ्यावे गुण शिवबाचे अंगी
चाल खेळावी अशी शतरंगी

क्षण क्षण येतो येथे प्रत्यय
नेक कामात नेहमीच व्यत्यय
करण्या पदक्रांती जीवनात
सर्व निती असाव्या आत्मसात

शिखर यशाचे करण्या सर
नको नजर आपली वरवर
सूक्ष्म असावी नेहमी रणनिती
जीवनास मिळेल योग्य गती

◼️✍️ श्रीकांत दीक्षित
      शाहूनगर, पुणे.
    (©सदस्य मराठीचे शिलेदार समूह)

🚩🌿🚩🌿🚩🌿🚩🌿🚩🌿🚩

◼️ गनिमी कावा

सह्याद्री च्या कडेकपारीतून
गगनभेदी जयघोष सारा
छत्रपती शिवाजी महाराज की जय
नसानसातुन घुमतो नारा

माणुसकीचे रक्षण करण्या
दिला परकीयांना शह
स्वराज्य स्थापण्यास केले
कित्येक जुलमी सत्तेशी तह

मावळ्यांच्या मनात पेटवली
धगधगत्या देशभक्तीची आग
गनिमी कावा करून मिळवला
आपल्या हक्काचा भूभाग ..

लोकशाहीची बिजे रोवली
तेव्हाच माझ्या शिवबांने
समानतेचे तत्व अंगीकारले
धर्मनिरपेक्षता जपली जोमाने

परस्रीला सन्मान देऊन
केला सत्कार तिचा
स्रीयांना मानाचे स्थान दिले
अधिकार दिला निर्णयाचा

कुलदैवत महाराष्र्टाचे
आमुची आण बाण अन शान
धन्य तुझी कल्पकता,निर्णयक्षमता
जगी वाढवी भारताचा मान..

◼️✍️. श्रीम संगिता बनसोड
       माणगांव, रायगड
       ©️सदस्या मराठीचे शिलेदार समूह

🔴  मुख्य सहप्रशासक/संपादक
राहुल पाटील
७३८५३६३०८८
मुख्य परीक्षक/प्रशासक
सौ सविता पाटील ठाकरे


➖➖➖➖🍁🌿🍁➖➖➖➖

3 Replies to “◼️ काव्यरंग :- गनिमी कावा”

  1. खूप खूप धन्यवाद सर.. माझ्या रचनेस विशेष मानांकन दिल्याबद्दल.
    🙏🌹

  2. हदयस्थ आभार आपले..
    माझ्या रचनेची सर्वोत्कृष्ट तीन मध्ये निवड केल्याबद्दल..🌹🙏

  3. हदयस्थ आभार आपले..
    माझ्या रचनेची सर्वोत्कृष्ट तीन मध्ये निवड करून लेखणी ला सन्मानीत केल्याबद्दल 🙏🙏🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *