◼️ काव्यरंग :- काव्यपंख…प .सु. किन्हेकर , (वर्धा )

🔷  कवितेचे शिर्षक -काव्यपंख 🔷

तारांगणी सजते सुर काव्यपंख

कोकिळ पक्षी कुंजन प्रीतभरी
उमटावा पडसाद पटलावरती
शंख फुकितो जोऱ्यात अंबरी !१!

उंच उंच राजहंसा झेप घे रे
पंखाचे थवे धवल भासते
बांधावा का विश्रामाला निवास
अरुणचे सोनेरी किरण दिसते !२!

कमलाकर शशी रवी तारे
मनोहर शीत लावण्य चंद्रिका
काव्यपंखाचे उघडता दार
हळूच थबकत येई कलिका !३!

ओहम सोहम ज्ञानबिंदू सरसे
चेतक शक्ती जागवी अंतरी
आंबवनी नर्तक मयुर नाचे
नवचेतना देई मज ह्रदयांतरी !४!

कवी : – 🖊️ प .सु. किन्हेकर , (वर्धा )
काव्यगंध कवितासंग्रहातुन घेतलेली कविता
 ©सदस्य मराठीचे शिलेदार समुह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *