◼️बालगीत :- सांग सांग भोलानाथ….✍️ ज्योत्सना अमोल खाजोने (बकाले)

-ii सांग सांग भोलानाथ ii-

सांग सांग भोलानाथ
शाळा उघडेल काय?
कोरोनाची लस घेऊनच
सगळ सुरक्षित होईल काय?

भोलानाथ भोलानाथ….!!1!!

शाळेमध्ये लस येऊन
टोचून मिळेल काय?
लस टोचून घेतल्यावर
मास्क वापरायचा नाही काय?
भोलानाथ भोलानाथ….!!२!!

Online च्या शिक्षणाचा
सगळीकडे बोलबाला
पाठा मधले दोनच शब्द
ऐकू येते कानाला
भोलानाथ भोलानाथ….!!3!!

घरी राहून राहून
आला आता कंटाळा
अभ्यासाचा बट्ट्याबोळ
लागून गेला सगळा
भोलानाथ भोलानाथ….!!4!!

भोलानाथ भोलानाथ
खर सांग एकदा
पहिल्यासारखी शाळा माझी
सुरू होईल केव्हा?
भोलानाथ भोलानाथ….!!5!!

एकाच वेळी प्रार्थनेला
सगळे होतील गोळा
मित्र आम्ही खेळू सगळे
सोळा सोळा सोळा
भोलानाथ भोलानाथ….!!6!!

एकाच डब्यातील भाजी पोळी
खाऊन घास तुकडा
किती मजा येईल
पूर्वीसारखी तेव्हा
भोलानाथ भोलानाथ….!!7!!

भोलानाथ भोलानाथ
खर सांग आता
जाताना च्या गर्दीत सगळा
विसरून जाऊ का korona?
भोलानाथ भोलानाथ….!!8!!

◼️  ✍️ज्योत्सना अमोल खाजोने (बकाले)
जि प शाळा अकोली जहागीर, तालुका अकोट, जिल्हा अकोला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *