◼️ काव्यरंग :- आस स्वातंत्र्याची..✍️ सौ.भारती सावंत, मुंबई

-ii आस स्वातंत्र्याची ii-

तोडण्या शृंखला गुलामीची
पत्करले वीरांनी बलिदान
फोडुनी डरकाळी नेत्यांनी
केले राष्ट्रभक्तांना सावधान

चले जावचा करताच नारा
स्वतंत्र जाहली भारतमाता
पेटूनी उठले रक्त क्रांतीने
स्वातंत्र्याचे गीत हे गाता

पारतंत्र्याच्या बेड्यात बंदी
होते जखडले दीडशे वर्षे
स्वातंत्र्याच्या ध्यासापायी
केले प्राणार्पण त्यांनी हर्षे

सुभाषबाबूं अन् भगतसिंग
बापू चाचा न् वीर विनायक
फुंकुनी रणशिंग स्वातंत्र्याचे
खवळूनी उठले क्रांतिकारक

भोगल्या किती नरकयातना
गाऊया पराक्रमाच्या गाथा
हळहळते अंत:करण आजही
टेकतो सकलजनांचा माथा

गुलामगिरीच्या विरोधातली
पेटली ज्योत आज समतेची
ब्रीद पाळता भाऊबंधुत्वाचे
आस लागली छाया ममतेची

🔷 ✍️ सौ.भारती सावंत
  मुंबई, 9653445835

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *