-ii विलोभनीय ii-
विलोभनीय उरूस
श्रावणातला पाऊस
दसरा दिवाळी सण
मांदियाळी चैत्रमास !!
सदनी द्वारात रोषणाई
द्विप पणती चेते समई
प्रकाशमय अंगण उंबरा
घाली रांगोळी बहीण आई !!
जत्रा भरली रं गावी
सप्ताह किर्तने हवी
दहीहांडी गोपालकाला
वदनी हरीनाम घ्यावी !!
विलोभनीय उत्साहावर
कोरोनाचे सावट जगभर
गणेश उत्सव नवरात्रीला
यंदा बॅन्डपथकांची उपासमार !!
◼️✍️ प. सु. किन्हेकर, वर्धा
सदस्य मराठीचे शिलेदार समूह