◼️ काव्यरंग :- स्वातंत्र्यदिन..✍️ प.सु. किन्हेकर, वर्धा

🇮🇳 स्वातंत्र्यदिन 🇨🇮

भारताचा स्वातंत्र्यदिन
७३ वा वर्धापणदिन
साजरा करू जनतेहो
मातृभूमी देश आझाद झाला
देऊया नारे चिरायू होवो !!

संकट ग्रहण देशावरी
कार्यक्रम होणार कसेतरी
स्वातंत्र्य जन्मसिध्द हक्क आहे
सोशल अंतर राखीत जावुतरी
एकस्वरात राष्ट्रगीते गाऊ !!

प्रणाम माझा भारतमातेला
सलामी देऊ तिरंगी ध्वजाला
प्राणपणाने लढले वीर योध्दे
थोर महापुरुषास अभिवादनया
स्वातंत्र्याची गीते गाऊ !!

स्वातंत्र्य स्वैराचार नव्हे
देशभक्तीचे आचार ठेवावे
सामुहिक संचार टाळावे
तिरंग्याची विटंबना करु नये
आदर कराया भान शिकावे !!

◼️✍️ प.सु. किन्हेकर, वर्धा
 सदस्य मराठीचे शिलेदार समूह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *