लाडबोरी गावात ग्रामपंचायत चा भोंगळ कारभार पुन्हा उघड: नाल्याची उपसा थातुर मातुर

लाडबोरी गावात ग्रामपंचायत चा भोंगळ कारभार पुन्हा उघड: नाल्याची उपसा थातुर मातुर

 

गावातील नागरिकाच्या आरोग्य चा खेळ : गावात चांगल्या नेतृत्वाचा अभाव

◼️✍️ सुनिल गेडाम, प्रतिनिधी

लाडबोरी: ग्रामपंचायत चा भोंगळ कारभार पुन्हा एकदा जनतेसमोर उघडा पडला आहे. पावसाळ्याचा आधी गावात पाणी साचू नये म्हणून नाल्याची साफसफाई केली जाते. पण लाडबोरी येथील ग्रामपंचायत ने जनतेच्या पैश्यानी केलेल्या नाली उपासण्यावर आज प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे, आज गावातील अबीर नागदेवते याच्या किराणा दुकाणा समोर आसलेल्या नाली त पाणी जमा होऊन आहे. पण ग्रामपंचायत मधील एकही लोकप्रतिनिधी चे लक्ष या कडे नाही. ही गावाच्या दृष्टीने खूप मोठी शोकांतिका आहे.

किराणा दुकान असल्यामुळे व आजू बाजूच्या घरातील लोकांना या नालीतील साचलेल्या पाण्या मुले डास तयार होऊन गावातील नागरिक चे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.पण याची जाण गावातील सरपंच ना होत नाही. अकार्यक्षम नेतृत्व असल्यामुळे गावाचा विकास खुंटत आहे, असेही म्हटलं तरी वावग होणार नाही.लोकाच्या तक्रार केल्यावरच सुध्दा काहीच कारवाई होत नाही, तर लोकप्रतिनिधी ज्या वॉर्डातून निवडून येतात त्या वार्ड च्या समस्या दिसत नाही. असे लोकप्रतिनिधी काय कामाचे असी कुजबुज गावातील नागरिक करीत आहेत. ज्या अपेक्षेने गावाचा विकास होण्याकरिता गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत वर निवडून दिले आत्ता ते लोकप्रतिनिधी गावातील अडीअडचणी कडे दुर्लक्ष करीत आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *