◼️ काव्यरंग :- हा देश माझा…✍️ मराठीचे शिलेदार समुह

मराठीचे शिलेदार कविता, चारोळी समूहातील सर्व समूहात घेण्यात आलेल्या ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील ” हा देश माझा ” या विषयावरील सर्वोत्कृष्ट ३ काव्यरचना..

 

⭕ हा देश माझा…

भगतसिंग सुखदेव राजगुरु
लाल बाल पाल…
स्वातंत्र्या साठी लढले सारे
केले शत्रूचे हाल…

आहे शूरवीरांचा इतिहास
होतो साक्षात्कार…
सार्थ असे अभिमान आम्हा
करतो जयजयकार…

वैविध्याने नटली संस्कृती
येथे भाषा अनेक…
हिंदू मुस्लीम शिख इसाई
येथे धर्म अनेक…

कड्या कपाऱ्या पर्वत रांगा
आहे मजबूत बंध…
गंगा जमाना सरस्वती
सप्त नद्या एकसंघ…

आधुनिकतेचे वाहते वारे
देश हा माझा…
उज्वल भारत पवित्र देशा
मानाचा मुजरा माझा…

तिरंगा लहरतो मनामनात
धगधगते राष्ट्रप्रेम…
करूनी एकमेका सहाय्य
जपूया बंधूप्रेम…  

◼️✍️श्रीकांत दीक्षित
शाहूनगर, पुणे.
(©सदस्य मराठीचे शिलेदार समूह)

🔴हा देश माझा🔴

ऋषिमुनींच्या पदस्पर्शाने
पावन झाली पवित्र भूमी
शतकानुशतके टिकून आहे
इथे श्रेष्ठ पुरातन संस्कृती… //

देव, धर्म, अन् देशासाठी
प्राणही प्रसंगी घ्यावे हाती
राणा, शिवा, बोस, भगत
गेले सांगूनीया आंम्हा प्रती.. //

झेलूनी परकीय आक्रमणे
ना झुकली उत्तुंग हिमशिखरे
पारतंत्र्याचे पुसूनी लांच्छन
ताठ उभी ती उन्नत मखरे… //

या स्वातंत्र्याच्या रणसंग्रामी
बलिदानाची दिधली किंमत
कणखर बाणा ताठर कणा
हरली नाही आमुची हिम्मत.. //

घडवू उद्याचा सक्षम भारत
आधारस्तंभ ही युवा पिढी
आंम्ही बनू स्वयंभू विश्वगुरू
विकासाची उभारू उंच गुढी… //

शांती, समता, सहिष्णुता
समन्यायी श्रेष्ठ संविधान
हा देश माझा असे महान
मनी वसे सार्थ अभिमान… //

◼️ ✍️, विष्णू संकपाळ

बजाजनगर ,औरंगाबाद
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह
🇮🇳✍️🇮🇳✍️🇮🇳✍️🇮🇳✍️🇮🇳✍️

 

🔷 हा देश माझा 🔷

हा देश माझा भारत

मज अभिमान याचा
आज स्वातंत्र्यदिन हा
असे दिस सोनियाचा ….

मुक्तीस्तव मा भारती
क्रांतिकारी ते लढले
शूरविरा त्या वंदीतो
फासावर जे चढले ….

निनादला आसमंत
जयघोषणेने सारा
प्राणाहून प्रिय आहे
आम्हा तिरंगा हा प्यारा ….

धरतीचा स्वर्ग आहे
जम्मू काश्मीर हा माझा
जीवनदायिनी नदया
हिमालय ही तो माझा ….

वेश भाषा नाना जरी
धर्म पंथ ते अनेक
देशभक्ती मनी असे
आहो आम्ही सर्व एक ….

🔷  किशोरकुमार बन्सोड
       गोंदिया
      © सदस्य मराठीचे शिलेदार समूह
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷

🔷 मुख्य सहप्रशासक/संपादक
राहुल पाटील, मो. ७३८५३६३०८८
🔷 मुख्य परीक्षक/प्रशासक
      सौ सविता पाटील ठाकरे
➖➖➖🍁🌿🍁➖➖➖

One Reply to “◼️ काव्यरंग :- हा देश माझा…✍️ मराठीचे शिलेदार समुह”

  1. धन्यवाद राहूल सर, सलग तिसरी रचना सप्तरंग मध्ये प्रकाशीत करण्यात आले…खरंच आनंद गगनात मावेना…🙏🌹🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *