गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते उश्राळ मेंढा येथे ध्वजारोहण  उश्राळ मेंढा येथील सरपंचांचा नाविन्यपूर्ण उपक्रम

गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते उश्राळ मेंढा येथे ध्वजारोहण
 उश्राळ मेंढा येथील सरपंचांचा नाविन्यपूर्ण उपक्रम

 
तळोधी (बा.) :– १५ ऑगस्ट चे औचित्य साधून १० वि तसेच १२ व्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला त्याचप्रमाणे त्यांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
  उश्राळ मेंढा येथील सरपंच श्री. हेमराज लांजेवार हे नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम करीत असतात. त्याच्याच एक भाग म्हणून नुकत्याच झालेल्या १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची अधिकाधिक आवड निर्माण व्हावी तसेच त्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून गावाचं नाव लौकिक करावा यासाठी गावतील गुणवंत विद्यार्थ्यांनच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  यावेळी गावतीलच कु. गायत्री युवराज लोंढे वर्ग १२ वा ९१% (विज्ञान) व १० व्या वर्गात शिकणारा लोकनायक धनंजय लांजेवार ८१% यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. व बाकी
         १०वी तसेच १२व्या इयत्तेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कौतूक करणे व त्यांना शाबासकीची थाप देने हे याहून मोठे काहीही नाही आणि त्यांना शाबासकीची थाप देणाची हीच खरी सुवर्णवेळ आहे. तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यानी खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने अभ्यासाला लागावे व परीक्षेत प्रावीन्यप्राप्त गुणांसह उत्तीर्ण व्हावे. असे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले सरपंच हेमराज लांजेवार बोलत होते.
          यावेळी कार्यक्रमाच्या वेळी ग्रामपंचायत तर्फे मुलांना वाचनालयाची सोय उपलब्ध करून देण्यात यावे  अशी मागणी विद्यार्थ्यांनी सरपंच हेमराज लांजेवार यांचे कडे केली. त्याना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देतांना यावेळी उपस्थित उपसरपंच लोंढे व ग्रामपंचायत सदस्य व गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.
जगभरातहाहाकार माजविलेल्या कोविड -19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सदर कार्यक्रम हा सामाजिक अंतर राखीत स्वतःला व इतरांना सुरक्षित ठेवत साजरा करण्यात आला.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *