◼️ काव्यरंग :- घन सावळा ✍️ भारती सावंत, मुंबई

घन सावळा

बरसलाय घन सावळा
अंधारुनीच आले सारे
किलबिलती ही पाखरे
सुटलेय बेभान रानवारे

थेंब टपोऱ्या पावसाचा
ओलावलीच ही धरणी
झालाय प्रसन्न वरूण
लावलीय त्यानेच वर्णी

चिंब झालेय सारे रान
कोसळूनी पर्जन्यधारा
मुले वेचती पागोळ्या
झेलुनी मुठीतच गारा

सरीवर सरी बरसता
शृंगारली ही वसुंधरा
नेसलीय शालू हिरवा
पसरलेय चैतन्य चरां

ऐकू येई धून बासरीची
निनादली दूरच्या रानी
किलबिल पाखरांचीही
वृक्षांवरी मंजुळ गाणी

चिंब ओलेत्या पंखांनी
साद पाखरांची आली
वारा पिऊनी सुखाचा
धरा हरितशालू ल्याली

चिमणचाऱ्याची वेळ
फडफडले इवले पंख
गावातल्या राऊळात
वाजविला कुणी शंख

मृगसरींचे होता सिंचन
मृदगंध तिथे दरवळला
थेंब तडकल्या मातीवर
अत्तराहूनी परिमळला

झरे निर्झर ओढे नद्या
भूवरी या झुळझुळली
नाद ऐकताची मंजुळ
तृष्णा गुरांची निवळली

गाई वासरे गोठ्यामध्ये
तृप्तीनेच अशी हंबरली
बरसताच पर्जन्य धारा
खुशीत स्वच्छंद चरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *