कोरोना महामारित गाव साथीच्या रोगांच्या सानिध्यात

लाडबोरी गावाची विकास कामे भ्रष्टाचारा मुळे थातुर मातुर का?

सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या कामावर प्रश्नचिन्ह

कोरोना महामारित गाव साथीच्या रोगांच्या सानिध्यात

✍️ सुनिल गेेेेडाम

सिंदेवाही : तालुक्यातील लाडबोरी ग्रामपंचायत मधील भोंगळ कारभार पुन्हा एकदा जनतेसमोर उघडा पडला आहे. गावातील विकास कामाच्या निधीला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले असून पावसाळ्याचा आधी गावात पाणी साचू नये व रोगराई चा सामना करावा लागु नये म्हणून गावातील संपूर्ण नाल्याची साफसफाई केली जाते. परंतु लाडबोरी येथील ग्रामपंचायत ने पूर्ण नाल्यांचा उपसा न करता थातूरमातूर नाल्या उपसून घेतल्या.आज या नाल्या उपासण्यावर आज गावातील जनताच प्रश्न चिन्ह निर्माण करु लागले आहे.आज गावातील नाल्यामधील गाड साफ झाले नसल्याने जागोजागी पाणी जमा होऊन डबके तयार झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.यामुळे गावातील नागरिकांचे व लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येणार आहे.पावसाळ्यात येणाऱ्या साथी रोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत आहे.पण या अगोदरच ग्रामपंचायत मध्ये भोंगळ कारभार असल्यामुळे आज गावात ठिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.बौध्द विहार जवळून जाण्या येण्याच्या मार्गावर दुतर्फा कचरा वाढला आहे, या मध्ये साप, विंचू , असण्याची शक्यता नाकारता येत नाही.इथून मोठ्या प्रमाणात माणसं सहित लहान मुलांचा वावर याच मार्गावरून होत असतो.त्यामुळे प्रसंगावधान बाळगले नाही तर जीविताला धोका निर्माण होऊ शकतो.तसेच अबीर नागदेवते याच्या किराणा दुकाणा समोर असलेल्या नाली मध्ये घाण पाणी साचत असल्याने लहान डबके तयार झाले असल्याचे दिसून येत आहे. व या मुळे पिण्याचे पाण्याचे नळ हे नाली जवळ असल्यामुळे हे घान पाणी नळ्याच्या गड्यात जात आहे, काही नागरिकांनी घरी नळ असून सुद्धा ह्या घान पाणी येण्यामुळे घरी पिण्यासाठी पाणी वापरू शकत नाही आहेत, किराणा दुकाना जवळील राहत असलेल्या घरानां व येथील नागरिकांना त्या सोबतच किराणा दुकानात येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांचे देखील आरोग्य धोक्यात आले आहे. या साचलेल्या घाण पाण्यामुळे डास तयार होऊन डेंग्यू, हिवताप, मलेरिया, या रोगांच्या प्रादुर्भाामुळे नागरिक साथीच्या रोगाला बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बाबतीत वाचा फोडण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून गावातील प्रश्न उचलून जनतेसमोर ठेवण्यासाठी लाडबोरी ग्रामपंचायत मध्ये माहितीचा अधिकार अर्ज करून गावाच्या विकास कामाच्या निधीची बाबत माहिती मागितली तरी अवधी होऊनही दिल्या जात नाही. उडवा उडवीत उत्तरे मिळतात.यामुळेच ग्रामपंचायत लाडबोरी ला विकास कामासाठी जो निधी मंजूर करण्यात आला.व तो किती निधीचा वापर करण्यात आले.तसेच गाव निर्मल करण्यासाठी संडास बांधकाम करण्यात आले.त्याची सुद्धा माहिती मागण्यात आली. तीही माहिती अपूर्ण दिली. यावरून असे निदर्शनास येते की ग्रामपंचायत ला मिळणारी निधी कुरण क्षेत्र बनले असुन ग्रामपंचायतलाच भ्रष्टाचार चे ग्रहण लागेल असे म्हणणे वावगे ठरणार नाही. गावातील जनतेला दाखविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून ओले हात करून थातुर मातुर उपसा केला. हे यावरून सिद्ध झाले आहे, अकार्यक्षम नेतृत्व असल्यामुळे गावाचा विकास खुंटत चालला आहे या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.याबाबतची संपूर्ण माहिती संबंधित अधिकारी यांना देण्यात आली असल्यामुळे पंचायत समिती स्तरावरून लक्ष केंद्रित करुन चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी.अन्यथा वरिष्ठ अधिकारी यांचे लक्ष वेधण्यासाठी काही नागरिकांनी आपली कैफियत तक्रारी च्या माध्यमातून शासन आणि प्रशासन कडे पोहोचवण्यासाठी पत्रकारितेचा हत्यार घ्यावा लागत असल्याचे मत बोलुन दाखविली आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *