◼️ काव्यरंग :- ये गं ये गं सरी…सौ.भारती सावंत, मुंबई

ये गं ये गं सरी

बरसुन गेल्या मृगसरी
ऋतू आला पावसाळा
नभही आले ओथंबून
जलधारांच्या या माळा

ये गं ये गं सरी आता
बरसून जा तु डोईवरी
मेघांनो सांडा पखाली
झरे वाहू दे वसुंधरेवरी

चोची पाखरांच्या भिजव
टिपु दे त्यांस चिमणचारा
घरटी बांधून वृक्षांवरतीच
शोधू दे त्यांना इथे निवारा

गाऊ पावसाची गाणी
मिळूनी गं साऱ्याजणी
नभांगणात खेळताती
चंद्रमा नि त्याची राणी

सरी ओघळती नभातून
इंद्रधनूची उमटूनी नक्षी
कमानदार सौंदर्य दिसे
प्रतिबिंब धरेच्या वक्षी

✍️ सौ.भारती सावंत, मुंबई
9653445835

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *