लॉकडाऊन च्या काळात बनविली गावा विषयी डॉक्युमेंट्री

लाडबोरी येथील युवक प्रज्ञावंत नागदेवते यांची उतुंग भरारी

लॉकडाऊन च्या काळात बनविली गावा विषयी डॉक्युमेंट्री

माझं गाव लाडबोरी डॉक्युमेंट्री चा ट्रेलर रिलीज

 

◼️ ✍️ सुनिल गेडाम, प्रतिनिधी

लाडबोरी: शहरात गेल्याला युवकांना व नोकरीत करत असलेल्या ना कायम आपल्या गावाविषयी एक ओढ असते. अशीच ओढ प्रज्ञावंत नागदेवते
लाडबोरी या युवकाला आहे. लॉकडाऊन च्या काळात शहरात तून गावाकडे आलेल्या युवकाला आपल्याला ही समाजाचे गावाचे देणे आहे. या प्रेरणेतून आपल्या मित्रांना होमराज जांभूळकर , एडिटर (वलनी / भंडारा) अनिकेत नागदेवते, प्रशिक नागदेवते, विनीत नागदेवते, शर्वील नागदेवते यांना घेऊन गावाची डॉक्युमेंट्री बनविण्याचा निर्णय घेतला. या साठी गावाचा संपूर्ण इतिहास शोधण्यास सुरवात केली. पण कोणतेही नवीन कार्य सहज रित्या होत नाही, त्या साठी कष्ट घ्यावे लागतात.आणि असेच कष्ट घेऊन गावातील संपूर्ण बारीक सारीक घटना व त्याची योग्य मांडणी करून डॉक्युमेंट्री तयार केली आहे.
या डॉक्युमेंट्री चा ट्रेलर लाँच केला.व संपूर्ण डॉक्युमेंट्री मध्ये आमचं गाव लाडबोरी २५ तारखेला प्रेक्षकाच्या भेटीसाठी येत आहे.या माध्यमातून गावातील काही जे नोकरी करणाऱ्या करीता बाहेर शहरात आहेत, व रोजगारासाठी बाहेर आहेत, कामाच्या व संसाराच्या व्यापातून जे वर्ष दोन वर्ष गावाकडे फिरकत नसतात.त्याच्या साठी हि एक डॉक्युमेंट्री पर्वणीच ठरेल, काही का असेना पण डॉक्युमेंट्री मधून सगळ्यांना आपलं गाव अनुभवता येईल हे नक्कीच!◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *