◼️ काव्यरंग :- प्रायश्चित्त ✍️प.सु. किन्हेकर, वर्धा

-ii प्रायश्चित्त  ii-

आत्मशिक्षा म्हणू की भोग
प्रायश्चिताचा लागू माथी रोग
तपश्चर्येविना कुणा मुक्ती नाही
नशिबी भावभक्ती योग नाही !!

विठ्ठला मी तुझा अपराधी
दे बा देवा संजीवन समाधी
संत माऊली ज्ञानेश्वर उदगारी
पाहु दे डोळी ती पंढरी आळंदी !!

उपदेश गुरू भगवंतू गहिनीनाथा
तोषोनी पसायदान निवृत्तीनाथा
सोपान मुक्ताई धाकटी भावंडे
कैवल्य ज्ञानराजा बाळे अनाथा !!

कुळकर्णी दाम्पत्य सोडी घरदार
न हिणवा जनांनो संन्यासाची पोरं
देहांत प्रायश्चित्त अनंतात विलीन
व्यर्थ बोले उच्चवर्ण छळी फार !!

ज्ञानेश्वरी भावार्थ दिपिका ग्रंथ
ज्ञानसागरा सच्चिदानंद लेखकू
रचोनिया पाया तुका झाले कळस
अर्थाविना वेदपाठे नये घोकू !!

◼️✍️ प.सु. किन्हेकर, वर्धा
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *