◼️ काव्यरंग :- पावसाळा. ✍️ खुशाब लोनबले, पवनपार, ता. सिन्देवाही, जि. चंद्रपूर

पावसाळा..

हे आसवांनो तुम्ही हसणे शिकून घ्या रे
जगण्यासाठी थोडे जहर पिऊन घ्या रे…

हा ऋतू आला ओलाचिंब पावसाळा
अरे आसवांनो ही संधी साधून घ्या रे…

स्मशानात शेवटचे कौतुक झाल्यावर
दलबदलू जमान्याचा चेहरा पाहून घ्या रे…

तिच्या भेटवस्तू मला ओळखून आहेत
चेहरा तुमचाही निराळा करून घ्या रे…

फुटला स्वप्नांचा तर फुटू दे आरसा
ही रात्र ओली पुन्हा जागून घ्या रे…

पिऊनही दुःखे जिंदगी कोरडीच आहे
दारुत आसवे थोडे मिसळून प्या रे…

नका देऊ आतल्या आवाजाला कंठ
सुनसान आयुष्याची गझल ऐकून घ्या रे…

हे आसवांनो तुम्ही हसणे शिकून घ्या रे….

✍️ खुशाब लोनबले, पवनपार
ता. सिन्देवाही जि. चंद्रपूर
मो. ९६८२१३००८५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *