◼️ काव्यरंग :- पाऊलवाटा..

👣 पाऊलवाटा 👣

आईच्या घराकडच्या पाऊलवाटा
सापडतील का हो कधी मला
सुन्न झाल्या सा-या वाटा
सदा तिच्या भेटीची आस मला

आई तुझी सारी वासरं
साद घालून टाहो फोडत आहेत ग
गेलीस आम्हा कुठे सोडुन दुर
केलसं तु मायेला पोरकं ग

विळखा घाली पाऊलवाटा अंतरी
गर्द या जीवनाच्या तिमीरात
प्राजक्तांच्या सुगंधापरी
जपले तुझ्या आठवांना कुशीत

कोलमडुनी गेले मायेचे छप्पर
नुसत्या चार भिंती उरल्या
भरुनी वाहे आसवांचा पुर
जणु तुझ्याकडच्या सा-या पाऊलवाटा हरवल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *