◼️ काव्यरंग :- अक्षरगंध…✍️मराठीचे शिलेदार समूह

मराठीचे शिलेदार कविता, चारोळी समूहातील दि २२/०८/२०२० रोजी घेण्यात आलेल्या ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील ‘अक्षरगंध’ या विषयावरील सर्वोत्कृष्ट ३ काव्यरचना. आपले मत, सूचना व अभिप्राय ‘सप्तरंगास’ कळवावे.

-ii अक्षरगंध ii-

अक्षरांची फुले उमलली
सुगंध पसरे चोहिकडे
व्यापला आसमंत सारा
महत्त्व असे सगळीकडे.!१!

अक्षरातूनी शब्द जन्मले
शब्दशब्दांचे वाक्य बनले
वाक्य अलंकार अर्थातूनी
बोधामृत आम्हांस लाभले.!२!

अक्षरांची भाषा आगळी
रूप तयांचे गोजीरवाणे
विविधभाषेतील ढंग वेगळे
उच्चारही तसेच साजीरवाणे.!३!

अक्षरगंधाच्या सुवासातुनी
मौलिक साहित्यीक निर्मिती
कथा काव्य गीत गझल अन
विविधरसांचीही अनुभूती.!४!

अक्षरगंधाची किमयान्यारी
नभांगणापलीकडे असे भरारी
अनुभव कल्पकतेचा गंध
कधी वास्तव्याची खळाळी.!५!

◼️✍️ आ प्राजक्ता र.खांडेकर, नागपूर
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.
🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁

-ii अक्षरगंध ii-

गोडी लागली मजला
शब्दांगणी खेळायची
सुटे धागे अक्षरांचे
शब्दांमध्ये गुंफायची ॥

गंध अक्षरांचा फार
अर्थ देवुनिया जाई
मनामध्ये शब्दफुले
गीत गातात अंगाई ॥

अक्षरांना भेटती रे
काव्यसुमनांची साथ
ओढ लागे साहित्याची
लेखना तत्पर हात ॥

समुहात दरवळे
सर्वत्र अक्षरगंध
शब्दांचीच उधळण
पसरला काव्यरंग ॥

◼️✍️ दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)
उस्मानाबाद
©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह
🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁

-ii अक्षरगंध ii-

अक्षर अक्षर जुळत गेले,
त्यातून शब्द घडत गेले,
मंद, धुंद, बेधुंद अक्षरगंधाने
शब्दपुष्पही सुगंधीत केले !

आम्हा घरी धन सदा
अक्षरांच्याच राशी असती,
अक्षरांचेच हिरे अन्
 मोती चमकती !

सकारात्मक अक्षरगंधासवे
सदा आमुची असे मैत्री,
जातील हे ही दिवस हीच
अक्षरे देतसे नित्य खात्री!

शब्दफुलांची गुंफता माला
अक्षरगंध दरवळत राही,
त्या गंधात बेधुंद होऊनी
काव्यभ्रमर फिरे दिशा दाही!
काव्यभ्रमर फिरे दिशा दाही!!

◼️✍️  श्री मंगेश पैंजने सर,
ता. मानवत, जिल्हा-परभणी,
© सदस्य, मराठीचे शिलेदार समूह
🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃

मुख्य सहप्रशासक/संपादक
राहुल पाटील
७३८५३६३०८८
मुख्य परीक्षक/प्रशासक
सौ सविता पाटील ठाकरे
➖➖➖➖🍁🌿🍁➖➖➖➖

One Reply to “◼️ काव्यरंग :- अक्षरगंध…✍️मराठीचे शिलेदार समूह”

  1. *कविता प्रकाशित केल्याबद्दल मनापासून धन्यवाद…..*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *