◼️ काव्यरंग :- सोबत…✍️सौ.भारती सावंत, मुंबई

सोबत

असू दे सखी तुझी
सोबतच जीवनभर
राहु दोघे एकमताने
होतो जीव खालीवर

प्रेमातच होऊया चिंब
सोडू नको माझा हात
आयुष्यभर मी देईन
तुजला प्रेमाची साथ

पाकळ्या अधरांच्या
सखी गं बघ उमलल्या
तुझ्या मुखावरच्या गं
स्मितरेषाही खुलल्या

बरसलेस प्रेम मजवरी
त्यातच मी चिंब न्हालो
सुखी झालो संगतीतच
तुझ्या जीवनात आलो

भाग्यवान आज आहे
सखी तुझ्याच संसारी
पूरवीन तव आकांक्षा
मी तुझीच प्रिये सारी

One Reply to “◼️ काव्यरंग :- सोबत…✍️सौ.भारती सावंत, मुंबई”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *