◼️ काव्यरंग :- काळोखाच्या राती 

काळोखाच्या राती 

मंगलमुर्ती कामनापुर्ती
तू आशावेधक इच्छापुर्ती
दुर लोटुन दे बुरेदिन
आणि काळोखाच्या राती !!
ग्रहणाची माशी देशावरती
तुलाच फिकीर माणसाप्रती
संकटमोचन हनुमान होऊन
चिंता भोग तू ची निवारती !!
भाविकवत्सल सर्वेसर्वा
वाहतो फुल बेल दुर्वा
शरण आलो अष्टविनायका
नुरवी पुरवी कृपामुर्ती !!
उजळी अक्षरांच्या ज्योती
साक्षरदिव्यात लावु शंभरवाती
निरक्षरतेचा सुंब जाळुनी
लक्षकेंद्रीत पणतीभोवती!!
औपचारीक अनौपचारीक
शिक्षण नसो कष्टदायक
मनोरंजन करवुन मुलांचे
कठिण सोपे होई फलश्रृती !!
शपथ घेऊनी करू श्रीगणेशा
प्रज्वलित होवो आकांक्षा मनिषा
उलथवुन टाकु वाईट चालीरीती
संकल्प निर्माणू जीवनपद्धती !!

प.सु. किन्हेकर, वर्धा
© सदस्य मराठीचे शिलेदार समूह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *