◼️ काव्यरंग :- आई तुझा पदर

-ll आई तुझा पदर ll-

खडतर जीवनाच्या वाटेवर,
असे तत्पर आई तुझा पदर ।।धृ।।
मी उघडा नागडा बघोनि ।
खिजऊ लागता मज कोणी ।।
कटीभोवती हा घेरोनि पदर ।
माये पांघरशी मायेची पाखर ।।१।।
गार गार हा हवेचा गारवा ।
छळ-छळिता या गरीब जीवा ।।
उब-उबदार गमते ही चादर ।
प्रेमे अश्शी लपेटुनि घेशी पदर ।।२।।
झळझळत्या उन्हाच्या झळा ।
मज लागती घामाच्या धारा ।।
गरगरा फिरवोनि हा पदर ।।
चेहरा धरी दो करी मारी फुंकर ।।३।।
टपक् टपक् त्या पाऊस धारा ।
भिजवू बघती मज या पामरा ।।
वाटे तेव्हा धरी कोणी छत्र चामर ।
हात डोई मातेचा फिरे आधार ।।४।।
खोड्या उनाडक्या लय माझ्या भारी ।
तुज लाथा बुक्या हाणल्या मांडी-ऊरी ।।
कोडगा ‘कृगोनि’ तरी आई घेई पदरी ।
लोकी तरी लाचार ठरी मायेचा पदर ।।५।।

कविराज :- “कृगोनि”-
श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे,
मु. काटली पो. साखरा,
त. जि. गडचिरोली.
भ्र. ध्व. 7414983339.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *