💕 प्रेमकुणावर करावे…?
प्रेम कुणावर करावे , प्रेम कुणावरही करावे;
प्रेम प्रेमळ आईवर करावे;
प्रेम कष्टाळू वडिलांवर करावे;
प्रेम करावे,त्या जन्म देणाऱ्या माता-पित्यावर…
प्रेम कुणावर करावे , प्रेम कुणावरही करावे;
प्रेम राजासारख्या भावावर करावे;
प्रेम परीसारख्या बहिणीवर करावे;
प्रेम करावे,त्या खेळकर दादा-दीदीवर…
प्रेम कुणावर करावे , प्रेम कुणावरही करावे;
प्रेम स्वप्नातल्या प्रेयसीवर करावे;
प्रेम वास्तवातल्या पत्नीवर करावे;
प्रेम करावे,त्या जीवनभर साथ देणाऱ्या जीवनसाथीवर…
प्रेम कुणावर करावे , प्रेम कुणावरही करावे;
प्रेम शिक्षा करणाऱ्या सरांवर करावे;
प्रेम मायेने जवळ घेणाऱ्या टीचरांवर करावे;
प्रेम करावे,त्या वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंवर…
प्रेम कुणावर करावे , प्रेम कुणावरही करावे;
प्रेम निळ्याभोर आकाशात भरारी घेणाऱ्या पक्षांवर करावे;
प्रेम घनदाट जंगलात फिरणार्या प्राण्यांवर करावे;
प्रेम करावे,त्या बोटांवर आठवण म्हणून रंग सोडून जाणाऱ्या फुलपाखरांवर…
प्रेम कुणावर करावे , प्रेम कुणावरही करावे;
प्रेम निरागस बालकांवर करावे;
प्रेम नाजूक झाडावरील कळीवर करावे;
प्रेम करावे,त्या देवाघरची फुले असणाऱ्या छोट्या मुलांवर…
प्रेम कुणावर करावे , प्रेम कुणावरही करावे.
प्रेम कुणावर करावे , प्रेम कुणावरही करावे.
✍️ कवी-श्री.दीपक सुरेश सहाणे
( तरंग कवितासंग्रह )
संचालक-यशराज अकॅडमी,नाशिक
📲संपर्क-8378937746