जीवन खुप सुंदर आहे ….
जीवन खुप सुंदर आहे
आयुष्याच्या बाजारात तुला हसू विकता आलं पाहिजे
लबाड नालायक हरामखोर लोकांमध्ये राहून
तुला तुझं ध्येय गाठता आलं पाहिजे…
दुसर्यांच्या डोळ्यात आसवांचे चांदणे दिसले तर
त्यांच्यासाठी
तुला तुझ्या आयुष्याचं हसू करता आलं पाहिजे…
नाहीच आवरलं तुझं दुःख तुला तर
झोपण्याचे सोंग करून गोधडीत तुला रडता आलं पाहिजे…
झालाच निश्चय कधी तुझा परिस्थितीशी लढण्याचा
तर त्याच आसवांना तुला पेटवायला आलं पाहिजे…
झालच नकळतपणे प्रेम कधी कुणावर
ते निभवता आलं पाहिजे
नुसत्याच सौंदर्याच्या मुखवट्याने
घायाळ होवून काय फायदा?
अरे ह्रदयात तिने केलेल्या नाजूक जखमांना
सहन करता आलं पाहिजे
चूक नसताना तिच्यासमोर झुकता आलं पाहिजे…
जीवन खुप सुंदर आहे
तुला जगता आलं पाहिजे….
तुझ्याशिवाय येथे तुला अडवणार कोण आहे
अडकलेल्या मनाला तुला सोडवता आलं पाहिजे
मार्ग कसाही असला तरी तुला चालता आलं पाहिजे
स्वतःच्या दुःखावर तुला हसता आलं पाहिजे…
जीवन खुप स्वादिष्ट आहे फक्त तुला
जीवनातील ‘मीठ’ शोधता आलं पाहिजे
आयुष्याच्या बाजारात तुला दुःख विकत घेता आलं पाहिजे…
◼️ खुशाब लोनबले, पवनपार, सिंदेवाही
जि. चंद्रपूर – ९६८२१३००८५