◼️ काव्यरंग :- घायाळ…..

💕 घायाळ…..

अजून करावे मज घायाळ किती
येते अजून ऐकू मज चाळ तिची…

या कुशीत फुलांचे तारुण्य हंगामी
तळमळते एकटी संध्याकाळ किती…

घेतला जरी आत मी बेभान वारा
उसळत्या श्वासाचा सांभाळ किती…

नाही भरवसा जरी उष्ट्या हळदीचा
सजवशी गळ्यात तू वरमाळ किती…

जमले पापण्यांवर ढगाळ वातावरण
अन् लोचनात निरभ्र(?)आभाळ किती….

निवांत आताच माझा डोळा लागलेला
अन् दारात उभी भयभीत सकाळ किती…

मुठीत बंद केल्या त्या कमजोर भाग्यरेषा
टाळायचेच नशिबा तर मज टाळ किती…

अजून करावे मज घायाळ किती….

🔷-खुशाब लोनबले, पवनपार, सिंदेवाही
जि. चंद्रपूर – ९६८२१३००८५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *