जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे 27 ऑगस्टला ऑनलाइन रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे 27 ऑगस्टला ऑनलाइन रोजगार मेळावा

चंद्रपूर,दि. 25 ऑगस्ट: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर या कार्यालयाचे वतीने दिनांक 27 ऑगस्ट 2020 रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. जिल्ह्यातील युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

इच्छुक ऊमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर स्वतःची नांव नोंदणी करावी. ज्यांनी यापूर्वी नावनोंदणी केलेली असेल अशा सर्व बेरोजगार उमेदवारांनी युजर आयडी व पासवर्डने लॉगीन करुन पंडित दीनदयाल उपाध्याय जॉब फेअर-2 यावर क्लिक करुन आलेल्या यादीतील अॅक्शन या कॉल मधील वॅकन्सी लिस्टिंग यावर क्लिक करावे.

वेबपोर्टलवर नोंद केलेल्या उद्योजकांच्या रिक्त पदांकरीता नोंदणी करावी. दिनांक 27 ऑगस्ट 2020 रोजी मेळाव्याचे दिवशी उद्योजकांसोबत व्हाट्सअप, गुगल मिट, व्हिडीओ कॉलींगच्या माध्यमातून मेळाव्याचे दिवशी संपर्क साधून ऑनलाईन मुलाखत द्यावी. अधिक माहितीकरीता कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक 07172- 252295 वर संपर्क साधावा ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हि आहेत उपलब्ध रिक्त पदे:

पीएनबी मेटलाइफ इंडिया इन्शुरन्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड चंद्रपूर या कंपनीमध्ये फायनान्शियल एडवाइजर या पदाकरीता 50 जागा आहेत. या पदासाठी उमेदवार दहावी, बारावी पास, पदवीधारक असावा.

पवनसुत मशिनरी अँड इलेक्ट्रिकल चंद्रपूर या कंपनीमध्ये अनेक पदांकरीता जागा उपलब्ध आहेत. या जागा पुढील प्रमाणे आहेत. एमबीए मार्केटिंग या पदाकरिता 3 जागा असून शैक्षणिक पात्रता एमबीए आहे.

एमबीए फायनान्शियल मॅनेजमेंट या पदाकरिता 2 जागा असून शैक्षणिक पात्रता एमबीए आहे. आयटीआय इलेक्ट्रिकल्स व आयटीआय इलेक्ट्रॉनिक्स या पदाकरिता प्रत्येकी एकूण 35 पदे असून एसएससी, एचएससी, आयटीआय शैक्षणिक पात्रता आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियर व इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयर या पदाकरिता प्रत्येकी दोन जागा असून पात्रता बीई आहे. वरील सर्व पदाकरिता वयोमर्यादा 18 ते 35 आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *