◼️ काव्यरंग :- सप्तरंग

🔶 सप्तरंग 🔶

मी एक कोरा कागद
ज्यावर तू चितारले…
तुझ्या अस्तित्वाचे सप्तरंग…
ज्याने मला मिळाली ओळख…
तुझे गर्द काळे कुंतल…
म्हणजे जणू
विसाव्याची धुंद निशा…
तुझ्या ओठांचा लालीमा..
जणू प्रसन्न सोनेरी उषा…
हिरवागार शालू चुडा…
सुखसमृद्धीची आभा…
नितळ गौर काया….
जणू पिवळा धमक चाफा…
लाल सफेद सदाफुली….
संतुष्टी समाधानाची छटा…
त्यागाची भगवी झालर…
प्रेमाची गुलाबी किनार….
निळ्याशार बोलक्या डोळ्यात…
सुप्त स्वप्नांची झलक…
आणि माझ्या नावाचा…
भाळी कुंकूम तिलक…
तुझ्या नाना विभ्रमांचे..
उधळलेस असे सप्तरंग…
विलोभनीय भावनांचा…
ह्रदयी फुलला वसंत. ..
ह्रदयी फुलला वसंत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *