◼️ काव्यरंग :- श्रावणाई..

श्रावणाई

श्रावणमासी निळ्याआभाळी;
नभ दाटले चोहिकडे,
क्षणात वारा;सरसर धारा;
अंगणी पावसाचे सडे,

घन बरसुनी श्रावणमासी;
इंद्रधनुची कमान,
तृण-पुष्पांची लेवुनी साडी;
वसुंधरेचे रूप छान,

रिमझिम-रिमझिम पाऊस धारा;
हर्ष माईना हृदयात,
किलबिल-किलबिल पक्षी बोलती;
धून गुंजे आसमंतात,

श्रावण मासी घेऊन येसी;
रत्नजडीत सणांची खाण,
हिरवाईने नटलेली वनश्रीच;
असे आपली – शाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *