धक्कादायक…! आईसमोर पाच वर्षीय मुलीला बिबट्याने उचलून नेले ; मुलीचा मृत्यू

 आईसमोर पाच वर्षीय मुलीला बिबट्याने उचलून नेले ; मुलीचा मृत्यू


उर्जानगर( चंद्रपूर ) : उर्जानगर वसहतीमध्ये आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास 5 वर्षाच्या मुलीला बिबट्याने ठार केले.
ही हृदयद्रावक घटना उर्जानगर वसहतीजवळ असलेल्या पर्यावरण चौकाजवळ घडली, लावण्या उमाशंकर धांडेकर ही 5 वर्षाची चिमुकली आई सोबत फेरफटका मारत असताना अचानक रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपातून बिबट्याने लावण्यावर हल्ला केला व तिला उचलून झुडपात नेले, ही सर्व घटना आई समोरच घडली.
लावण्या ला बिबट्याने नेल्यावर आईचा आक्रोश ऐकून नागरिकांनी झुडपाकडे लगेच धाव घेतली व बिबट्याला धुडकावून लावले.
बिबट्याने लावण्याला सोडत तिथून पळ काढला.
लावण्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, लावण्याचे वडील हे केंद्रीय सुरक्षा दलात कार्यरत आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *