◼️ काव्यरंग :- चेंगड ✍️ सदस्य, मराठीचे शिलेदार समूह

मराठीचे शिलेदार कविता, चारोळी समूहातील दि. २६/०८/२०२० बुधवार रोजी घेण्यात आलेल्या ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेतील ‘चेंगड‘ या विषयावरील सर्वोत्कृष्ट ३ काव्यरचना. आपले मत, सूचना व अभिप्राय ‘सप्तरंगास’ कळवावे.

-ii चेंगड ii-

लहानपणी मित्रांसोबत चेंगड
करताना खुप मजा येत होती
आता आयुष्याची जबाबदारी
मित्रापासून दूर घेऊन जात होती

निरागस हास्य आता लोप पावली
उन्हात हारवली मायेची सावली
आठवण येत राहते लहानपणाच्या
चेंगडपणाची पावलो पावली

आठवणीना अश्रूंची आता
साथ मिळू लागली आहे
आठवणीची नाव आता
अश्रूत वाहू लागली आहे

शहरातून गावाकडे जेव्हा पाय
वर्षातून एकदा वळू लागतात
लहानपणीच्या गंमती जमंती
डोळ्यासमोरून पळू लागतात

शाळेसमोरून जाताना
डोळ्यात अश्रू तरळून येतात
मित्रांसोबतची केलेली चेंगड
पुन्हा पुन्हा आठवू लागतात

श्री विजय शिर्के , औ. बाद
© सदस्य मराठीचे शिलेदार समूह
🤡🤫🤡🤫🤡🤫🤡🤫🤡🤫🤡

आजकालची पोरं ही
खुपंच झालीय हेकड
मोका पाहून गर्दीचा
करू लागलीय चेंगड

भान नाही जाण नाही
कुणाचीही नसे पर्वा
वर्तन‌ असे यांचे जणू
जगाचे हेच सर्वेसर्वा

बेधुंद करती लुटालूट
आया बहिणीची छेड
सभ्यतेस देवून फाटा
मिरवती नाहक हे वेड

लहान थोर वयोवृद्ध
आदर नसे आचरणी
मानवास लाजवणारी
तरूणांची ही करणी

मन कुणाचे दुखवता
नसते थोडी जाणीव
आचरणात हरवलेली
सुविचारांचीच उणीव

नागरिक म्हणून ठेवा
मनी कर्तव्य आठवण
वागणुकीत असू द्या
संस्कारांची साठवण

सुसभ्य वर्तन करूनी
जपा संस्कृतीचा ठेवा
पाहून तुझ्या गुणांना
वाटो प्रत्येकास हेवा

मीता नानवट‌‌‌कर नागपूर 
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह
🤡🤫🤡🤫🤡🤫🤡🤫🤡🤫🤡

दिस उगवला की सुरूच होतो
तुझा धिंगाणा धांगड
चैन नसे क्षणभर जीवाला
असा करतोस रे चेंगड..!

छोट्या छकुली सवे खेळता
तिचं ओढतोस रे तंगडं
थोडा ओरडा देता तुजला
होतं तुझं तोंड वाकडं..

लपवून ठेवतो आजोबांची काठी
कधी चष्म्याची भानगड
शोधताना जीव मेटाकुटीला
थांबव रे तुझं चेंगड..!

कुठलंही काम करत असता
तुझी नुसतीच रे गडबड
घालून ठेवतो नुसता पसारा
कधी आवरत नाही धड..

मोतीच्या शेपटीला बांधे दोरी
पाय अडकून झालंय ते लंगडं
कुठं कुठं नी कुठवर आवरू
तूच आवर रे तुझं चेंगड..!

घरोघरी असे नटखट कान्हा
करती सदा न् कदा धडपड
तुझ्या खोड्या नि माझ्या कामाची
कशी घालावी सांगड..

सुरू होऊ दे शाळा देवा
नको ठेऊ भिजत घोंगडं
दमुन गेल्या सगळ्या मैया
किती हे पोरांचं चेंगड..!

स्वाती मराडे, पुणे
© सहप्रशासक, मराठीचे शिलेदार समूह
🤡🤫🤡🤫🤡🤫🤡🤫🤡🤫🤡

मुख्य सहप्रशासक/संपादक
राहुल पाटील
७३८५३६३०८८
मुख्य परीक्षक/प्रशासक
सौ सविता पाटील ठाकरे
➖➖➖➖🍁🌿🍁➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *