आल्या गौरी
गौरी आल्यात माहेराला
सासुरवाशीनी गं दमुनी
करूया स्वागत दोघींचे
जाई गोतावळ्यात रमूनी
करूनि भाजी न् भाकरी
दाखवूया नैवेद्याचा घास
गौरी नांदती सुखात तिथे
पाहुण्या आल्यात खास
मढवू अलंकार वस्त्रांनी
गौरी देखण्या सुंदर छान
काजळाची लावूया तीट
जसे केवड्याचेच पान
साड्या नेसल्यात रेशमी
पदरही घेतलाय डोईवरी
काठाला सोन्याची तारही
आल्यात सालंकृत भूवरी
त्यांच्या आधी पोहोचलाय
लाडका गणेश भाऊराया
आल्या पाठीमागूनी गौरी
सुख माहेराचे अनुभवाया
घालू आज पुरणपोळीचा
गोडधोड पक्वान्नाचा घाट
जेवू खाऊ घालूयाच त्यांना
वाढेल माहेरात त्यांचा थाट
सोन्यामोत्यांनं भरलीय बाई
साडीचोळीची त्यांची ओटी
गौरी गुणाच्या असे माझ्या
सदा माहेरचे गुणगान ओठी
घालूया सख्यांनो रात सारी
आज मंगळागौरीचा जागर
माहेरवासाने भरुन देऊया
जिव्हाळ्याने त्यांची घागर