◼️ काव्यरंग :- झळ

 

ll झाडीपट्टी मराठी बोलीतील रचना ll

🌧️ झळ 🌧️

भूरूकापासून लागली, पाण्याची भुरभुर
गरम गरम खावाची, मनात हुरहुर

पेटवली चूल, बसवला तावा
लाकळीतलं चनं, पावून खावा

घरामंधी धसला , थंडा थंडा हवा
बोतरऱ्यांत धसून, चुपचाप रावा

चंगा अष्टा खेळात, रमलं काई जन
होळ लागली त्यायच्यात, जिकल कोण

पोराबारा उतरलं, आंगणातल्या चिकलात
बुळगा बोंबलून उठला, येवा नोको घरात

बुळग्याची नकल करुन, हासले फसफस
असा रायते आमचा, झळीचा दिवस

✍️ मनोज पेटकुले
मु. बोथली, पो. खजरी, ता. स./अर्जूनी, जि. गोंदिया

One Reply to “◼️ काव्यरंग :- झळ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *