◼️ काव्यरंग :- गाव बोलावतंय…

गाव बोलावतंय

चेहरा हरवला
रंग जरी उजाळला
गर्दीत शहराच्या मित्रा
गावचा पार तु विसरला

मोठी स्वप्न तुला प्यारी
तरी गावची मजा न्यारी
तुला इथे पिझ्झा- बर्गर मिळते
सुखाची भाकर गावातच गिळते

फ्लॅट तुला खायला उठेल
गावची गार हवा नक्की आठवेल
दमा, BP, मधुमेह होतील तुझे मित्र
डोळ्यापुढे येईल गावचे चित्र

पैशाने तु होशील मोठा
आनंदाचा राहील तोटा
एकटेपणा वाढेल कधी
गावचं शिवार आठवेल आधी

मित्रा, नको दवडु वेळ
लवकर कार Start कर
तुझ्या आठवणीत झुरतेय
गावातले तुझे घर….

कवी संतोष गव्हले, (प्राथमिक शिक्षक)
केंद्रीय विद्यालय, आयुध निर्माणी चांदा, जिल्हा- चंद्रपूर-442501

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *