◼️ काव्यरंग :- एकदा तरी…✍️ पद्माकर भावे, ठाणे

एकदा तरी

मनसोक्त भिजावं पावसात,
रुजावं मातीत,
फुटू द्यावेत कोंब..
मातीतल्या इच्छांना…!
एकदा तरी स्वच्छ व्हावं

आकाश, व्हावं निरभ्र…!
वाहू द्यावेत प्रवाह..
अडकून पडलेले !
धुतले जावेत डाग,
पुसल्या जाव्यात –
नकोश्या खुणा !
उराव्यात आणि उगवाव्यात
फक्त हिरव्या खुणा…!
निरभ्र अंबरात पसरावेत पंख,
दुमडून पडलेले…. !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *