◼️ काव्यरंग :- सूर्य


सूर्य 

प्रथम भास्करा
सूर्यदेवते ला नमन
सोन्याची किरणे उधळती
उपकार तुझे कोटी श: वंदन

तिमिरातुनी प्रकाशाकडे नेई
तूच भाग्यविधाता दाता
सृष्टीचा तू पालन करता
आदित्य तू प्रकाश निर्माता

आळस सारा झटकून द्या
सौरऊर्जेचा करावा आधार
नव्या पिढीला आवाहन हे
ऊर्जेचा जपून करा वापर

दिवाकर ची किमया भारी
दहा दिशांना प्रकाश पसरी
सृष्टी नववधूचा शृंगार करुनी
लखलखते ही दुनिया न्यारी

तरु वेली झाडे पक्षी
आनंदती रविकिरणांच्या पायी
संध्याकाळची दिनकरा ची लाली
प्रकाश ते सर्वत्र मंत्रमुग्ध ठायी

जगावर तुझे थोर उपकार
सुखी ठेवतो लहानथोरांना छान
सर्वांना आरोग्य लाभावे
हीच सूर्यदेवता प्रार्थना महान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *