डिजिटल मार्केटिंग कार्यशाळेचे आयोजन

डिजिटल मार्केटिंग कार्यशाळेचे आयोजन

चंद्रपूर दि. 28 ऑगस्ट : महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र चंद्रपूर द्वारे 10 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक/युवतींकरीता दि. 1 सप्टेंबर रोजी एक दिवसीय कालावधीचे ऑनलाईन डिजीटल मार्केटिंगची कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील युवक युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सदर कार्यशाळेत ऑनलाईन बिझनेस संधी आयडिया मार्केटिंग स्ट्रॅटेजी, गुगल अॅडव्हर्ड, गूगल

अॅनालिटिक्स, सोशल मिडीया मार्केटिंग, युटुब, घरी बसून पैसे कमविण्याची संधी उद्योग उभारणी प्रक्रीया, इत्यादी विषयांवर ऑनलाईनद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणात ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता इच्छूक युवक/युवतींनी त्वरीत दि. 31 ऑगस्ट

पर्यंत अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड, मो.न. 9403078773, 07172-274416 व कार्यक्रम आयोजक लक्ष्मी खोब्रागडे,  मो. नं. 9309574045 यांच्याशी संपर्क साधावा.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *