◼️लाॅकडॉऊन मधील जीवन गाथा

🔴  लाॅकडॉऊन मधील जीवन गाथा

का ? कसे ? असे अचानक मानवाच्या कर्मानेच हे आले,

घरात सर्वजण एकत्र असता भीतीने दार हे बंद झाले।
—————————-
स्वच्छ हवा निळेशार पाणी
सुंदर निसर्गात पाखरांची गाणी,

पण मनास शांत करावे कसे

भुकेल्या पोटाची जेव्हा हाक ऐकू येतसे।
———————————–
समजुनी खुद्द स्वतःला देव
संपविसी मुके, निष्पाप प्राणीजीव,
आता विनवीसी कर जोडूनी
हे परमेश्वरा ! आम्हा सुखी ठेव !
———————————
चार भिंतीआड रक्षण करूनी
गुदमरून जगावे प्रत्येक दिवशी

त्यापेक्षा संयमाने घरात राहून

दोन हात करू या कोरोनाशी।
———————————-
मनुजा, होउ दे या कलियुगाचा अंत
कुणालाच नकोय ‘आयसोलेशन’ चा एकांत,
संपू दे आता लाॅकडाऊन ची ही व्यथा
सुरु होऊ दे सुखी माणसाची..

पुन्हा एकदा जीवनगाथा
पुन्हा एक दा जीवन गाथा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *