◼️ काव्यरंग :- “कोरोनाचा भस्मासूर”

“कोरोनाचा भस्मासूर”

कोरोनाचा भस्मासुरान घेरलंय जगाला;
आता तरी समजवा तुम्ही तुमच्या मनाला,

नका सोडू आपलं स्वानंदी घरदार;
नाहीतर कोरोना करेल तुमच्यावरच वार,

देह त्याचा छोटासा तरी तांडव जगभर सुरू;
कोरोनाला नमवण्यासाठी स्वच्छतेची कास धरू ,

कोरोना सोबतच युद्ध आपल्यालाच जिंकायचंय;
न घाबरता एकजुटीने घरात बसूनच लढायचंय,

सर्दी,खोकला नि तापानेे झाला जर तुम्ही ग्रस्त;
त्वरित भेट दया डॉक्टरांना न होता त्रस्त,

अमेरिका,इटली,स्पेन नि चिन झालेत खूप हैराण;
कारण सर्वांच एकच कोरोनाने घातले थैमान,

कोरोना विषाणू असला जरी अनोळखी भक्षक;
तरी मीच बनणार आता माझा नि कुटुंबियांचा रक्षक,

सफाई कामगार,पोलिस नि डॉक्टर देऊ यांना साथ;
तरच करू शकू एकजुटीन कोरोनावर मात.

◼️ श्री.दीपक सुरेश सहाणे
नगरकर गुरुकुल प्राथमिक विद्यामंदिर,नाशिक
संपर्क-८३७८९३७७४६.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *