◼️ काव्यरंग :- देवा जाऊ नका सोडून…

देवा तुमचा हात धरलाय,
पाठ फिरवून असे
तुम्ही जाऊ नका…..
डोळ्यानंमध्ये भाव
उतरलायं, आम्हां
सोडून असे राहू नका….

मोदक,लाडू, मिठाईने,
साज तुमचा आम्ही
सजवलाय….
मुशकराजने आनंदाने,
गोड फळांचा भोग
मागवलाय……

आरती,स्रोत,मंत्रासाठी
बाबांनी, टाळ नवा
मागवलाय…..
बप्पा तुमच्या नावाचा,
सूर रोज नवा मी
वाजवलाय…..

येणे-जाणे बप्पा चालू
तुमचे,काय आम्हा
फसवताय…..
ओठांनवरती हसू ठेऊन,
डोळ्यांनमध्ये रडवताय…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *