◼️ काव्यरंग :- कळत नकळत

…. कळत नकळत ….

कळत नकळत जुळते नातं
जस दवबिंदू आणि गवताच पात,
सहवास क्षणभराच एवढीच खंत
पण तरीही विचार कोण करत….

दवबिंदूच प्रेम पात्यावरच ओघळत
कधी अश्रू तर कधी मोती होऊन बरसत,
अलगदपणे येऊन मातीत मिसळत
बघून हे पात्याच मन करपत….

जीवापाड जपलेले नाते असे तुटतं
तेव्हा काय न कसे वाटते,
आठवणींच्या वेदनांनी मन कस झुरत,
हे ज्याने प्रेम केलंय त्यालाच कळत….

विसरायचं म्हटलं तरी कोण विसरत
नाही म्हटलं तरी पुन्हा पुन्हा आठवतं,
कारण प्रेमाच नातं हे असच असत,
प्रेम तर नाही आयुष्य मात्र संपत….

💕 कवी.. राज गुरनुले
मु. पो. गुंजेवाही (कोठा ), ता. सिंदेवाही
जि. चंद्रपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *