◼️ काव्यरंग :- आई..

आई म्हणजे प्रेमाचा सागर
प्रेम अमृताने भरलेली घागर
आई म्हणजे वात्सल्याची मूर्ती
तिच्यापासून होत नाही ध्येयाची पूर्ती

आई म्हणजे वात्सल्य
तीच जगत जननी
तिच्या ओठी असते अमृत
आणि नयनी असते पाणी

आई म्हणजे प्रेमाचा निर्मळ झरा
आई म्हणजे साय दुधावरची
आत्मा आणि ईश्वर यांची सांगड
प्रतिमा ती परमेश्वराची

आई सारखे दैवत दुसरे कोणी नाही
आई म्हणजे कर्तव्यपूर्तीची खाण
आई म्हणजे कृपाछत्र जीवन सूत्र
सर्व परिवाराची ती मानसन्मान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *